Join WhatsApp group

“वजन कमी करा, शिक्षण विसरून जा!”मुर्तिजापूरातील काही जिल्हा परिषद शिक्षक बनले ‘वेलनेस कोच’

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रतिनिधी, मुर्तिजापूर (दि. 26 जुलै) –शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याऐवजी, मुर्तिजापूर तालुक्यातील काही जिल्हा परिषद शिक्षकांनी आता ‘वजन कमी करा’ मोहिमेच्या नावाखाली वेलनेस कोच बनण्याचा नवा मार्ग स्वीकारल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

या शिक्षकांकडून शाळांपेक्षा घरोघरी फिरून “हर्बल डिटॉक्स”, “कॅलरी डेफिसिट”, “प्रोटीन सप्लिमेंट्स” यांचे महत्त्व पटवले जात आहे. शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट बाजूला ठेवून, हातात प्रोटीन पावडरचे डबे आणि तोंडात परदेशी संज्ञा घेऊन हे शिक्षक आता लोकांना ‘फिटनेस गुरू’सारखे सल्ले देत आहेत.

शाळा सोडा, सेशन पकडा!

अनेक शिक्षक शाळेच्या वेळातच Zoom किंवा Live सेशन्सद्वारे वजन कमी करण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला असून, शिक्षणाचा दर्जा घसरल्याची चिंता पालक आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

“कमिशन आणि क्लायंट्सचं शिक्षण?

“या मोहिमेमागे काही ‘नेटवर्क मार्केटिंग’ कंपन्यांचा हात असल्याचा संशय असून, शिक्षकांकडून कमी खाणे, पाणी अधिक पिणे आणि त्यांच्याकडूनच उत्पादन घेण्याचा आग्रह केला जात आहे. “कमिशन घ्या, पण शिक्षण द्या!” असा संतप्त सूर नागरिकांतून उमटत आहे.

शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

शिक्षकांनी आपल्या मूळ कर्तव्याकडे दुर्लक्ष करून इतर व्यावसायिक भूमिकेत प्रवेश करावा, हे नक्कीच शंकास्पद आणि दुर्दैवी आहे. तरी शिक्षण विभागाने बारीक लक्ष ठेवून आपल्या शिक्षकांवर लक्ष देण्याची गरज आहे. तसेच शिक्षण विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि गरज असल्यास, नियमांमध्ये सुधारणा करून शिक्षणव्यवस्थेचा गाभा वाचवावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

पालकांचा सवाल?

“शिक्षक शिक्षक म्हणून राहतील का सेल्समन म्हणून?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!