Join WhatsApp group

मूर्तिजापूर मध्ये बनावट ओळख व खोट्या कागदपत्रांवरून २ लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : कारंजा टी-पाईंट परिसरातील एका व्यावसायिकाची खोटी ओळख आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रकाश बापूराव मनवर आणि अश्विन सिध्दार्थ लांडगे, दोघेही नागपूर येथील रहिवासी, यांच्याविरोधात भारतीय नवदंड संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचा आरोप

फिर्यादी मोहन श्रीधर खवले (वय ५२) हे मूळचे कांरजा टीपाईंट, मूर्तिजापूर येथील असून सध्या नूतन रेसिडेन्सी, कंवर नगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मालकीचा 5076.94 चौरस फुटांचा प्लॉट असून त्यावर दुकान व घर आहे. मुलींच्या शिक्षणासाठी कुटुंबासह अमरावतीला स्थलांतर झाल्यानंतर त्यांनी हा प्लॉट विक्रीस ठेवला.

सदर आरोपींनी खवले यांच्याशी संपर्क साधून 4 कोटी 70 लाख रुपयांत सौदा निश्चित केला. सौद्याचा पहिला टप्पा म्हणून 50 लाखांचा चेक (अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक) दिला. त्याचवेळी ‘कमिशन’च्या नावाखाली फिर्यादीकडून 2 लाख रुपये रोख रक्कम घेतली.

मात्र, सदर चेक बँकेत सादर केल्यानंतर तो निधीअभावी नाकारण्यात आला. त्यानंतर आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल फोन बंद आढळले. पुढील चौकशीत प्रकाश मनवर याने खोटे नाव सांगून बनावट आधारकार्ड सादर केल्याचे उघड झाले असून, अश्विन लांडगे याच्यासोबत संगनमत करून बनावट दस्तऐवजांच्या आधारे फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी महिला पोलीस हवालदार शालिनी सोलंके (ब.क्र. 2121) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन ताटे करत आहेत.

शहरात खळबळ

या प्रकारामुळे मूर्तिजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक नियुक्त केले असून, नागरिकांनी कोणत्याही मालमत्ता व्यवहारात पूर्ण खातरजमा करूनच पुढे जावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!