Join WhatsApp group

वाल्मीक समाजाचा सनातन धर्म रक्षणात मोलाचा वाटा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त छडी पूजन व रक्तदान शिबिराचे आयोजन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – ऋषी वाल्मीकि यांच्या परंपरेतून उदयास आलेल्या वाल्मीक समाजाने काळोखाच्या काळातही सनातन धर्माची पताका उंच ठेवली. रामायण रचणाऱ्या ऋषींच्या स्मरणातून आजही हा समाज सेवा, शौर्य आणि स्वाभिमान यांचे दर्शन घडवत आहे. राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि मध्य प्रदेशात वाल्मीक समाजाच्या धार्मिक स्थळांचे जतन होत असताना अकोल्यातही समाजाच्या समस्या सोडवण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, “सनातन धर्मावर वारंवार आक्रमण होऊनही वाल्मीक समाजाने छडी पूजन, वीर गोगाजी व वीर रतनसिंह यांचा त्याग लक्षात ठेवत धर्मरक्षणाचे कार्य सुरूच ठेवले आहे.

नव्या पिढीला या परंपरेची जाणीव करून देणे आवश्यक आहे.”कार्यक्रमात 17 ठिकाणी वीर गोगाजी रतन नवमी निमित्त छडी पूजन करणाऱ्या भक्तांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी सहभाग घेतला, तर 127 जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली. लेडी हार्डिंग हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत मसणे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंत खंडेलवाल, समीक्षा अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, माधव मानकर, गिरीश जोशी, पवन महल्ले, एडवोकेट देवाशिष काकड, रमेश करिअर, डॉ. युवराज देशमुख, उमेश लखन, उज्वल बामनेट, आकाश सावते, राजेश प्रधान, सारिका जयस्वाल, अर्चना चौधरी, राजे चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवा भगत, मोहन भगत गांगे, अर्जुन भगत, हेमंत भगत झांजवटे, अशोक भगत, जीत भगत, संतोष भगत खंडारे, धीरज भगत, कालू भगत निनोरे, पुरुषोत्तम भगत, राजेश प्रधान, विवेक भरणे, व अनेक स्वयंसेवकांनी अथक मेहनत घेतली.

कार्यक्रमात बोलताना आमदार सावरकर यांनी “वाल्मीक समाजाच्या अडीअडचणी समजून घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न सुरू राहील,” असे आश्वासन दिले. भगत समाजानेही “हिंदू धर्मासाठी सदैव समर्पित राहण्याचा” निर्धार व्यक्त केला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!