Join WhatsApp group

“ब्लड डोनर अँड हेल्पर ग्रुप”च्या युवकांकडून रक्तपेढीसाठी महत्त्वाचं पाऊल; आमदार हरीश पिंपळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर, १९ जुलै — मूर्तिजापूर तालुक्यातील “ब्लड डोनर अँड हेल्पर ग्रुप” या युवक संघटनेने रक्तपेढी स्थापनेसाठी पुढाकार घेतला असून, हा सामाजिक भानातून उचललेला अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या उपक्रमाला मूर्तिजापूरचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांनी सकारात्मक प्रतिसाद असून लवकरात लवकर मूर्तिजापुरीमध्ये रक्तपेढी सुरू करण्यात येईल असे आश्वासन आमदार हरीश पिंपळे यांनी दिले आहे

मूर्तिजापुरात अपघात, गरोदर माता, थॅलसेमिया, शस्त्रक्रिया अशा अनेक परिस्थितीत वेळेवर रक्ताची गरज निर्माण होते. मात्र तालुक्यात रक्तपेढी उपलब्ध नसल्याने रुग्णांना अकोला, अमरावती सारख्या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि जीव धोक्यात येतो. ही बाब लक्षात घेऊन ब्लड डोनर अँड हेल्पर ग्रुपच्या युवकांनी एकत्र येत उपजिल्हा रुग्णालयासह आमदार पिंपळे यांना निवेदन सादर केले.

आमदार हरीश पिंपळे यांनी या तरुणांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले, “ब्लड डोनर अँड हेल्पर ग्रुपने समाजासाठी एक अत्यंत आवश्यक मुद्दा समोर आणला आहे. रक्तपेढी ही मूर्तिजापूर साठी काळाची गरज असून, मी स्वतः हा प्रस्ताव लवकरच आरोग्य विभागाकडे सादर करणार आहे. तरुणांचा हा सहभाग निश्चितच प्रेरणादायक आहे.”

प्रमुख मुद्दे :

रक्तपेढी नसल्यामुळे अनेक रुग्णांना मोठा त्रास

“ब्लड डोनर अँड हेल्पर ग्रुप”च्या युवकांनी सादर केलं निवेदन

आमदार हरीश पिंपळे यांची तात्काळ सकारात्मक प्रतिक्रिया लवकरच शासनाकडे पाठवला जाणार प्रस्ताव.

ब्लड डोनर अँड हेल्पर ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीने मूर्तिजापुरातील आरोग्य सुविधांच्या दृष्टीने नवा अध्याय सुरू झाला आहे.

युवकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आणि आमदार हरीश पिंपळे यांचा सक्रिय पाठिंबा मिळून तालुक्यात लवकरच रक्तपेढीची स्थापना होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!