Join WhatsApp group

१७ वर्षांनी स्वप्न साकार! अकोला-पूर्णा मार्गावर पहिली दैनंदिन एक्स्प्रेस २० जुलैपासून सुरू

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : १८ जुलै २०२५ : सुमारे १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अकोला-पूर्णा ब्रॉडगेज मार्गावर अखेर पहिली दैनंदिन एक्स्प्रेस गाडी सुरू होणार आहे.

१७६०५/०६ काचीगुडा-भगत की कोठी एक्स्प्रेस ही गाडी दिनांक २० जुलैपासून नियमितपणे धावणार असून, या ऐतिहासिक प्रवासामुळे अकोला आणि पूर्णा परिसरातील प्रवाशांचे जुने स्वप्न पूर्णत्वास जात आहे.

ब्रॉडगेजचा ऐतिहासिक प्रवास

२००८ मध्ये उद्घाटन: ११ नोव्हेंबर २००८ रोजी मीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर तीन पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या.

२०११ मध्ये विस्तार: काचीगुडा-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस अकोलापर्यंत वाढवण्यात आली, पण ती नवीन गाडी नव्हती.

दीर्घ प्रतीक्षा: नव्या एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत प्रवासी वर्षानुवर्षे होते.

मीनाक्षी एक्स्प्रेसच्या आठवणी ताज्या

पूर्वी मीटर गेज मार्गावर धावणारी हैदराबाद-जयपूर “मीनाक्षी एक्स्प्रेस” २००६ मध्ये बंद झाली होती. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी अकोला-पूर्णा मार्गावर पुन्हा लांब पल्ल्याची नियमित गाडी धावणार आहे.

दळणवळणाचा नवा अध्यायही एक्स्प्रेस गाडी केवळ अकोला व पूर्णा नव्हे, तर मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण भारत यांना अधिक सुलभपणे जोडणारा दुवा ठरेल. स्थानिक उद्योग, शिक्षण व रोजगारासाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!