Join WhatsApp group

तात्पुरत्या परवान्याच्या (टीपी) नावाखाली शहरात मोकाट फिरणारे ‘९० यमराज = ९० ट्रक + १ आखरे दलाल कोण?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : ✍️ जयप्रकाश मिश्रा (जिल्हा प्रतिनिधी)

शहरातील वाहतूक नियंत्रणाचे नियम केवळ कागदापुरते उरले आहेत, हे शहरातील ‘टीपी’च्या नावावर चालणाऱ्या ट्रकच्या बेकायदेशीर वाहतुकीवरून दिसते. जड वाहनांच्या शहरात प्रवेशास बंदी असतानाही, हे ट्रक – जे बहुधा गौण खनिजे (गिट्टी, वाळू, मुरूम) वाहून नेतात – सर्रास शहरात वावरताना दिसतात. हे ट्रक ‘तात्पुरता परवाना’ (Temporary Permit – TP) असल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात ही व्यवस्था बेकायदेशीर दलाली व प्रभाव शक्तीवर चालत असल्याचे आरोप आहेत. या मुळे वाहतूक विभाग संशयाचा भोवऱ्यात असल्याचे चित्र दिसत आहे.

🚛 90 ट्रक = 90 यमराज?

शहराच्या चौकात नो-एंट्री असतानाही हे ट्रक थेट शहरात प्रवेश करतात.

ट्रक थांबवले तर “वरून फोन” येतो आणि काही सेकंदांत त्यांना मोकळा रस्ता मिळतो.

हे ट्रक विशेष फलकासह ओळखले जातात, म्हणजेच त्यांचं संरक्षण कोणीतरी खात्रीने करतं आहे.

💰 १०० रुपयात नो एंट्री पार!

फक्त ₹१०० च्या मोबदल्यात हे ट्रक नो-एंट्री झोनमधून शहरात प्रवेश करतात.

वाहतूक पोलिसांकडे दुर्लक्ष करण्यासाठी दबाव किंवा पैसे दिले जातात.

👤 ‘आखरे’ नावाची विशेष भूमिका

एका ‘आखरे’ नावाच्या व्यक्तीवर या ट्रकच्या हालचालींचं नियंत्रण असल्याचे बोललं जातं.

तो ट्रक अडवणाऱ्या कर्मचाऱ्याला २४ तासात “धडा” शिकवतो, अशी भीती पसरलेली आहे.

❓ प्रश्न प्रशासनासमोर :

तात्पुरता परवाना (टीपी) कायदेशीर आहे का?

जर TP असेल, तरीही नो-एंट्रीमध्ये शहरात प्रवेश कसा काय दिला जातो?

वरून येणारे फोन कोणाचे?

यामागे राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप आहे का?

अखेर या बेकायदेशीर साखळीचा सूत्रधार कोण?

📢 जनतेची मागणी :

पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करावी.

आखरे नावाच्या व्यक्तीविरुद्ध तपास सुरू करावा.

टीपीचा गैरवापर थांबवून वाहतुकीस सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत आणावं.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!