Join WhatsApp group

Ads

विदर्भ कॅट संघटनेच्या प्रमुखपदी वसंत बाच्छूका यांची निवड; अकोल्याच्या गौरवात भर

By Sarkarmzanews

July 14, 2025 9:23 pm

Ads

अकोला –सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि बँकिंग क्षेत्रासोबतच व्यापारी आणि धार्मिक क्षेत्रात गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने सेवा देणारे वसंत बाच्छूका यांची विदर्भ कॅट (कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) संघटनेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

यानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात भाजपाचे माजी अध्यक्ष विजय अग्रवाल म्हणाले की, “वसंत बाच्छूका यांनी समाजसेवेच्या माध्यमातून अकोल्याचे नाव सर्वत्र उज्ज्वल केले आहे.

भाजपाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी गेली २५ वर्षे यशस्वीरित्या पार पाडलीआहे.

“कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी अकोला कार्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जयंत मसने होते.

यावेळी मंचावर माधव मानकर, चंदाताई शर्मा, रमेश अलकरी, संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, संजय बडोणे, अंबादास उमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनप्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर,खासदार अनुप धोत्रे,आमदार वसंत खंडेलवाल,महानगर अध्यक्ष जयंत मसने,माजी अध्यक्ष विजय अग्रवाल,नवीन नियुक्त वसंत बाच्छूका हे उपस्थित होते.

सदर प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यातसंजय गोटफोडे, रमेश अलकरी, आम्रपाली उपरवट, चंदाताई शर्मा, संजय बडोणे, राजेंद्र गिरी, संदीप गावंडे, रणजित खेडकर, गोपाळ मुळे, तुषार भिरड, नितेश पाली, अमोल गीते, नितीन राऊत, दिलीप भरणे, राजेश वगारे, प्रकाश घोगलिया, मनिष बाच्छूका, सागर शेगोकार, सिद्धार्थ उपरवट, विद्याधर काकड, वैकुंठ ढोरे, सूरज शेळके, हर्ष चौधरी, मनिष बुंदेले, उज्वल बामनेट, संतोष बाभुळकर, शिवलाल इंगळे, राहुल चौरसिया, तसेच अनेक मंडळ संयोजक व अध्यक्ष उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!