Join WhatsApp group

ब्रिटिश कालीन अकोट फाईल रेल्वे पूलच्या पुनर्बांधणीस तात्विक मंजुरी – खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अकोलेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी! अकोला-अकोट दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन अकोट फाईल रेल्वे पूलाच्या पुनर्बांधणीसाठी तात्विक मंजुरी मिळाली असून, लवकरच नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी खासदार अनुप धोत्रे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून याला मान्यता मिळाली आहे.

शिवाजी पार्क ते अकोट फाईल दरम्यानचा जुना पूल सध्या अत्यंत जर्जर स्थितीत आहे. या पूलाची सेवा मुदत संपली असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन पूल उभारण्याची नितांत गरज होती. ही गरज लक्षात घेऊन खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष मागणी केली होती.या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मध्य रेल्वे विभागाने पूलासाठी सर्वेक्षण व स्टीमेट तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

लवकरच अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेचे अधिकारी अकोल्यात दाखल झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री वैष्णव यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

यासोबतच, अकोला रेल्वे स्टेशनला विशेष दर्जा देण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.या विकासकामात आमदार रणधीर सावरकर यांचेही सहकार्य लाभले असून, अकोट फाईल पूल पुनर्बांधणीबाबत त्यांनी खासदार धोत्रे यांच्याकडे मागणी केली होती.

नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता आता लवकरच होणार आहे.या पावलामुळे अकोल्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच वाहतुकीला नवे आयाम मिळणार आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!