Join WhatsApp group

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन गायींचे प्राण वाचले

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : बार्शीटाकळी: कत्तलीसाठी चारचाकी वाहनातून बेकायदेशीरपणे गायी नेल्याची माहिती मिळाल्यानंतर बार्शीटाकळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन गायींचे प्राण वाचवले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत, बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण धुमाळ यांना महिंद्रा पिकअप (क्रमांक MH 30 BD 7769) मधून गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानुसार त्यांनी डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले.पोलिसांनी तत्काळ सापळा रचून वाहन थांबवले आणि झडती घेतली.

तपासादरम्यान ९० हजार रुपये किमतीच्या दोन गायी आढळल्या. या कारवाईत एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात दोन गायी (कीमत अंदाजे ४.५ लाख) आणि महिंद्रा पिकअप वाहन (कीमत ९० हजार) यांचा समावेश आहे.गायींची देखभाल करण्यासाठी त्या आदर्श गौसेवा संस्था यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमोल, योगेश आणि बोरसे यांनी केली.

> सतर्कतेमुळे गायींचा जीव वाचला — नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!