Join WhatsApp group

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ऑनलाईन कार्यशाळा संपन्न➤ 400 ते 500 क्रीडा शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा मा. जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 12 जुलै 2025 रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दोन सत्रांमध्ये पार पडली.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री. राजेश गावंडे (जिल्हा स्काऊट संघटक) यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सतीशचंद्र भट्ट (जिल्हा क्रीडा अधिकारी) यांनी केले.क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाईन प्रणालीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. प्रवीण बनवालीकर यांचे स्वागत डॉ. भट्ट यांनी केले.तसेच मनपा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. बुडन गाडेकर, सचिव श्री. राजेश्वर पाठक, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अरुण परभणीकर, अकोला तालुका संयोजक प्रदीप थोरात, बाळापूरचे दीपक तायडे, पातूरचे विठ्ठल लोथे, अकोटचे शरद हिंगणकर व मूर्तिजापूरचे ज्ञानेश टाले यांनीही प्रवीण बनवलीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अकोला महापालिकेतील क्रीडा शिक्षक, तसेच अकोला तालुक्यातील मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांचा सहभाग होता. दुसऱ्या सत्रात मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यांतील क्रीडा शिक्षक सहभागी झाले.

या कार्यशाळेत ऑनलाईन सॉफ्टवेअरविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सुमारे 400 ते 500 क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला आणि सॉफ्टवेअर संदर्भातील शंका दूर करण्यात आल्या.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी निशांत वानखडे, अजिंक्य धेवढे, राजू उगवेकर, गजानन चाटसे, नितीन मोगरे व अनुप वर्मा यांनी विशेष मेहनत घेतली, अशी माहिती डॉ. सतीशचंद्र भट्ट यांनी दिली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!