Join WhatsApp group

मुर्तिजापूर नगर परिषदेमध्ये गाडगेबाबांची मूर्ती केवळ देखावा – त्यांच्या विचारांचा विसर नगर परिषदेला?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (११ जुलै) –गाडगे महाराज हे स्वच्छता, सदाचार आणि जनजागृती यांचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांची कर्मभूमी असलेल्या मुर्तिजापूर शहरात नगर परिषदेच्या प्रवेशद्वारी त्यांची भव्य मूर्ती उभी करण्यात आली आहे. मात्र, ही मूर्ती आज केवळ ‘शोभेची वस्तू’ बनून राहिली आहे, अशी तिखट टीका स्थानिक नागरिक करत आहेत.

शहरातील कचरा व्यवस्थापनाची अवस्था दयनीय बनली आहे. बहुतांश ठिकाणी कचरापेट्यांचा अभाव असून, रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहे. काही वर्षांपूर्वी नगर परिषदेला स्वच्छतेसाठी पुरस्कार प्राप्त झाले होते, मात्र आता त्या पुरस्कारांचे स्मरण फक्त कार्यालयाच्या शोभेसाठी राहिले आहे.

स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होत असून, नगरपरिषदेचा कर्मचारी वर्ग जबाबदारी झटकताना दिसतो. नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून, “गाडगेबाबांचे विचार नगर परिषद धाब्यावर बसवत आहे”, असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. शासनाचे पैसे खर्च करून प्रसार माध्यमांवर व पेंटिंग करून स्वच्छताचा शहरात दिखावा होत आहे.

स्वच्छ शहर हे नागरिकांचे स्वप्न ठरतेय फसवेगिरी!

मुर्तिजापूरकरांचे म्हणणे आहे की, गाडगे महाराजांनी गावोगाव जाऊन स्वच्छतेचा संदेश दिला, पण त्यांच्या कर्मभूमीतच स्वच्छतेचा अभाव हे दुर्दैव आहे. नगर परिषदेला गाडगेबाबांची मूर्ती उभारण्याइतकीच त्यांची शिकवणही मनावर घ्यायला हवी होती, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.

oplus_8388608

समस्या दिसूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष:

शहरात कचऱ्याचे ढीग साचलेत, नागरिक त्रस्त आहेत, आरोग्यावर परिणाम होत आहे – तरीही नगर परिषद दुर्लक्ष करत आहे. हे बघून वाटते की त्यांना ‘जाणीव’ आहे, पण ‘जबाबदारी’ नाही.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!