Join WhatsApp group

Ads

“समीर देशमुख व इरफान खान यांचा NIS कुस्ती कोर्स यशस्वी – विदर्भात प्रेरणादायी पाऊल”

By Sarkarmzanews

July 10, 2025 8:44 pm

Ads

अमरावती |

नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पटियाला (पंजाब) येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत झालेल्या एन.आय.एस. कुस्ती कोर्स मध्ये अमरावतीतील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ पैलवान समीर दीपक देशमुख आणि इरफान खान यांनी यशस्वीपणे सहभाग नोंदवत कोर्स पूर्ण केला आहे.

या कोर्स दरम्यान त्यांनी आधुनिक कुस्ती तंत्रज्ञान आत्मसात केले असून, आता त्यांनी अधिकृतरित्या प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. हा कोर्स संपूर्ण करून दोघांनी विदर्भातील कुस्ती क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.कोर्सनंतर त्यांनी सांगितले की, “विदर्भातील व अमरावती जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंनीही या क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवावे, यासाठी आम्ही काम करत राहू.

“या यशाबद्दल पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ. माधुरी चेंडके आणि डॉ. संजय तिरथकर यांच्यासह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी दोघांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अमरावतीतील कुस्ती क्षेत्रात या बातमीनंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुस्तीप्रेमी, खेळाडू आणि पालकांकडून दोघांचे कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!