Join WhatsApp group

महिला प्रवाशाला शिवशाही बसमधून मध्येच उतरवले! कंडक्टरचा उद्धटपणा – तिकीटही न देता दिली वागणूक; प्रवाशांमध्ये संतापाची लाट

Photo of author

By Sarkarmzanews

Share

७ जुलै २५ (मुर्तीजापुर): दिनांक ०६ जुलै २५ रोजी अमरावतीहून बुलढाण्या कडे जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये प्रवास करत असलेल्या अँकर शिवकन्या शिवानी किशोर श्रीराव यांना बस कंडक्टरने बनोरा जवळ मध्येच उतरवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिकीट न देता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता, उद्धट भाषेत बोलून महिलेला बसमधून खाली उतरवण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवकन्या यांनी केला आहे.

घटना कशी घडली?

शिवशाही बस (क्र. MH 06 BW 1233) अमरावतीहून निघून मुर्तीजापूरमार्गे बुलढाण्याकडे जात होती. नियमित प्रवासी असलेल्या शिवानी श्रीराव या बसमध्ये चढल्या. मात्र कंडक्टर ए. एल. शेख यांनी त्यांना तिकीट न देता, थांब्याआधीच बनोरा येथे उतरवून दिले.

शिवकन्या यांनी विचारले असता, कंडक्टरने “मुर्तीजापूर स्टॉप घेत नाही, इथेच उतरा” असे उद्धटपणे उत्तर दिले. त्यांनी असा आरोपही केला की, “हा कंडक्टर नेहमीच महिलांशी अश्लील व उद्धट वर्तन करतो.”

एकादशीची गर्दी आणि बस थांब्याचा बहाणा

आषाढी एकादशी निमित्त प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने बसमध्ये गोंधळाचे वातावरण होते. फक्त एकच सीट शिल्लक होती. त्यामुळे कंडक्टरने मुर्तीजापूरचा थांबा न घेता महिलेला मध्येच उतरवले, असा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रवाशांचा संताप – कंडक्टरवर कारवाईची मागणी

या घटनेनंतर महिला प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवकन्या शिवानी श्रीराव व इतर महिलांनी संबंधित कंडक्टरवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून महिलांवर असा अन्याय होणे अत्यंत निंदनीय आहे. सरकार एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे अशा वागणुकीने महिलांचा अपमान होतोय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!