Join WhatsApp group

रोटरी क्लब अकोला नॉर्थचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

“सामाजिक समस्या सोडविण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घ्यावा” – डॉ. के.के. अग्रवाल

अकोला | ६ जुलै २५|

रोटरी क्लब अकोला नॉर्थचा पदग्रहण सोहळा 30 जून 2025 रोजी उत्साहात पार पडला.

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. के. के. अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सध्याच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी रोटरी क्लबसारख्या संस्थांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.“या प्रसंगी डॉ. श्रद्धा अग्रवाल यांनी अध्यक्षपद, तर प्रा. महेश बाहेती यांनी सचिव (प्रशासन) आणि स्नेहल दोशी यांनी सचिव (प्रकल्प) पदाची धुरा स्वीकारली.सोहळ्यात दीपप्रज्वलन, स्वागतगीत, अहवाल वाचन, मान्यवरांचा सत्कार, नवे सदस्यांचे स्वागत, तसेच वर्षभरातील सामाजिक प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र वाकचवरे आणि ममता खेतान, तर आभार प्रदर्शन स्नेहल दोशी यांनी केले.कार्यक्रमात अकोल्यातील विविध रोटरी क्लब्सचे पदाधिकारी, नवीन सदस्य, तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने झाली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!