Join WhatsApp group

इंडो पब्लिक स्कूलचा छात्र वेदांत अग्रवाल NEET परीक्षेत अमरावती जिल्ह्यात टॉपर!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अमरावती (6 जुलै 25) – इंडो पब्लिक स्कूलचा उज्वल विद्यार्थी वेदांत अग्रवाल याने यंदाच्या NEET (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) मध्ये 616 गुण मिळवत अमरावती जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर त्याने ऑल इंडिया रँक (AIR) 498 मिळवून राष्ट्रीय पातळीवरही आपले नाव उजळवले आहे.

वेदांतने नर्सरीपासून बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण इंडो पब्लिक स्कूलमध्येच पूर्ण केले आहे. त्याने बारावी CBSE परीक्षेत 91.4% गुण आणि दहावीमध्ये 95% गुण मिळवले होते. तसेच महाराष्ट्र CET मध्ये 99.77% आणि JEE परीक्षेत 98.17% गुण मिळवले आहेत.

आज शाळेत आयोजित विशेष सत्कार समारंभात प्रधानाचार्य श्रीमती विजय बागड मॅडम यांनी वेदांतचा सत्कार केला. त्यांनी वेदांतचा प्रेरणादायक प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडताना त्याचे व्यक्तिमत्त्व, अभ्यासातील चिकाटी व नम्रता याचे विशेष कौतुक केले.

वेदांतने शाळेतील विद्यार्थ्यांना आपले विचार सांगताना अभ्यासाच्या काही विशेष तंत्रांची माहिती दिली व सर्वांना मेहनतीचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाला त्याच्या दादी माॅ, वडील मनिषजी अग्रवाल, आई आशा अग्रवाल, तसेच शाळेचे उपप्रधानाचार्य श्री. योगेश ठाकरे सर उपस्थित होते.

वेदांतने आपल्या यशाचे श्रेय शाळा, शिक्षक आणि पालकांना दिले. शाळेच्या संचालिका डॉ. आयुषी देशमुख मॅडम यांनीही वेदांतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!