Join WhatsApp group

मुर्तीजापूर शहरातील तीन गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम तडीपार – शहर पोलिसांची धडक कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : ५ जुलै २५ : शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना तडीपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली व कलम ५६ अन्वये ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.

तडीपार करण्यात आलेले आरोपी

१. अजय ऊर्फ काल्या रमेश गावंडे – जबर चोरी, चोरी करताना दुखापत करणे, अवैध दारू विक्री, व बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल.

2. निखिल ऊर्फ सलमान रामा तायडे – महिलांचा विनयभंग, त्यांच्या मागे लागणे, घरात अनधिकृतपणे प्रवेश करणे, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे असे गुन्हे.

3. ऋषिकेश बाळू किर्दक – घातक हत्यार बाळगणे, जाणीवपूर्वक इजा करणे, शांतता भंग करणे, अवैध शस्त्र ठेवणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील.

सदर तिघांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५६ अंतर्गत तडीपाराची कारवाई करण्यात आली असून त्यांना अकोला ,वाशीम,व अमरावती जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, ठाणेदार अजित जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे व सचिन दांदळे यांचे या कारवाईत योगदान उल्लेखनीय राहिले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!