Join WhatsApp group

अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे सेवेस सुरुवात; अंडरपासचेही भूमिपूजन– खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक ४ जुलै २५: खासदार अनुप धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मागणीवरून दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे.

वारकऱ्यांसाठी कमी दरात आणि चांगल्या सुविधांसह ही गाडी उपलब्ध होणार आहे. अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

५ जुलै, शनिवार रोजी सकाळी १०.३० वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून ही विशेष रेल्वे गाडी पंढरपूरकडे रवाना होईल. या वेळी खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

यावेळी उपस्थित मान्यवर:

आमदार प्रकाश भारसाकळे,आमदार हरीश पिंपळे,आमदार वसंत खंडेलवाल,आमदार जयंत मसने,भाजपा महिला आघाडी नेत्या सौ. सुवासिनीताई धोत्रे, सौ. मंजुषाताई सावरकर, सौ. पुष्पाताई खंडेलवालविजय अग्रवाल, किशोर पाटील, चंदाताई शर्मा, अर्चना शर्मा, नितीन राऊत, पवन महाले, अ‍ॅड. सुभाष ठाकूर, अ‍ॅड. देवाशिष काकड इत्यादींचा सहभाग असेल.त्याच दिवशी दुपारी २ वाजता अनवी मिर्झापुरी रेल्वे क्रॉसिंगजवळील अंडरपासचे भूमिपूजनही खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.

सर्व वारकरी, सनातनप्रेमी, भाजपा कार्यकर्ते व विविध आघाडीचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माधव मानकर, गिरीश जोशी, अ‍ॅड. देवाशिष काकड, संजय जोशी, रमेश अल्लकरी, हिरा कृपलानी, आम्रपाली पर्वत उपरवट यांनी केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!