Join WhatsApp group

सरकार माझा न्यूजचा प्रभाव – आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत बोगस बियाण्यांचा मुद्दा लावून धरला!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला जिल्हा │ सरकार माझा न्यूज

दिनांक ४ जुलै २५ : सरकार माझा न्यूजच्या सातत्यपूर्ण बातम्यांचा आणि शेतकऱ्यांच्या आवाजाला अखेर विधानसभेतही प्रतिसाद मिळाला आहे. अकोला जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आमदार हरीश पिंपळे यांनी थेट विधानसभेत मांडल्या.

पिंपळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,

“राज्यातील अनेक भागांमध्ये बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील अनेक तालुक्यांत ही परिस्थिती गंभीर आहे. अशा बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.”

सरकार माझा न्यूजने यापूर्वी सतत बोगस बियाण्यांबाबत आवाज उठवला होता, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. याच पत्रकारितेच्या प्रभावामुळे हा मुद्दा विधिमंडळात पोहोचला, ही शेतकरी समाजासाठी मोठी आश्वासक बाब आहे.

पिंपळे यांची मागणी:बोगस बियाणे कंपन्यांची तत्काळ चौकशीदोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणे

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईकृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे

शेतकऱ्यांनी सरकार माझा न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आमचा आवाज ऐकून आमदारांनी विधानसभेत मुद्दा मांडल्याने आम्हाला आता आशा वाटते की न्याय मिळेल.”

सरकार माझा न्यूज आपल्या वाचकांच्या पाठिशी सदैव उभा आहे.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई अजून संपलेली नाही!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!