Join WhatsApp group

काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश :आ.साजिद खान पठाण यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : ०२ जुलै २५: धुळे येथील माजी आमदार आणि काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते कुणाल पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला.

त्यावरून अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार सादिक खान पठाण यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जोशी म्हणाले की, “गेल्या ७५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करणारे नेते, जसे की अशोक चव्हाण यांचे कुटुंब, मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे घराणे, आता भाजपात प्रवेश करत आहेत. ही भाजपाच्या विचारसरणीचा आणि विकासात्मक कार्यपद्धतीचा विजय आहे.

जनतेचा विश्वास भाजपावर आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर भाजपात प्रवेश होत आहे.”सादिक पठाण यांच्यावर निशाणा:गिरीश जोशी यांनी म्हटले की, “पठाण यांना भाजपाची इतकी भीती वाटते की, त्यांना रात्रंदिवस धनाजी-संताजीसारखी भाजपा दिसते.

भाजपावर आरोप करण्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांवर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

“नाना पटोलेच्या निलंबनावरून टीका फेटाळली:

आ. साजिद खान पठाण यांनी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका दिवसाच्या निलंबनावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोशी म्हणाले, “भाजप आमदार संजय कुटे यांना काँग्रेस सरकारच्या काळात १३ महिने निलंबित करण्यात आले होते.

त्यावेळी कुठे होती लोकशाही? ओबीसी आरक्षण व शेतकरी प्रश्नावर त्यांना निलंबित करण्यात आले.

काँग्रेसनेच हे पाप केले होते.”भाजपचा दावा:

काँग्रेसमधून भाजपात येणे ही जनतेचा निर्णय गिरीश जोशी यांनी स्पष्ट केले की, “कुणाल पाटील, अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश म्हणजे फक्त पक्षांतर नाही, तर तो जनतेच्या अपेक्षांनुसार घडत असलेला राजकीय परिवर्तन आहे.

हे परिवर्तन काँग्रेससाठी आत्मचिंतनाचा मुद्दा ठरायला हवा.

काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असल्याने, भाजपने याला जनतेच्या विश्वासाचा विजय मानले आहे. काँग्रेस आमदार सादिक पठाण यांच्यावर भाजपने टीका करत आत्मचिंतनाचा सल्ला गिरीश जोशी यांनी दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!