Join WhatsApp group

मुर्तीजापुरात तांदुळाचा ट्रक पोलिसांनी पकडला; पुरवठा विभागाच्या अहवालावर अवलंबून ट्रकची सुटका होणार का ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर – १ जुलै २५

२८ जून २०२५ रोजी बाळापूर वरून येणारा तांदुळाने भरलेला एक ट्रक गुप्त माहितीच्या आधारे मुर्तीजापुर पोलिसांनी थांबवून पोलिस स्टेशनमध्ये आणला. ही कारवाई २८ जून रोजी पार पडली. प्राथमिक तपासात, हा ट्रक एका रेशन माफियाचा असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

सध्या ट्रकवरील तांदुळ हा कायदेशीर आहे की काळाबाजारात विक्रीसाठी नेला जात होता, हे पुरवठा विभागाकडून येणाऱ्या तपशीलवार अहवालावर अवलंबून आहे. अहवाल आल्यावरच ट्रक सोडायचा की गुन्हा नोंदवायचा, हे ठरणार आहे.

🔍 मागील घटनांचा संदर्भ

मागील अनेक प्रकरणांत पोलिसांनी अशाच प्रकारे तांदुळाने भरलेल्या ट्रक पकडले आहेत, परंतु राजकीय हस्तक्षेप व बनावट कागदपत्रांच्या आधारे हे ट्रक पुरवठा विभागाच्या संगनमताने परत सोडले गेले, अशी चर्चा नागरिकान मध्ये होत आहे.

📦 तांदूळ कोणासाठी आणि कुठे?

विशेष म्हणजे हे ट्रक गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा अशा जिल्ह्यांकडे रवाना होत असल्याचे कागदपत्रांत दाखवले जाते. परंतु या जिल्ह्यांमध्ये स्वतः मोठ्या प्रमाणात तांदूळ उत्पादन होते, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील तांदूळ तिकडे पाठवण्याची गरजच काय? – असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

🧾 प्रशासनाची भूमिका काय?

अलीकडेच तहसीलदार बोबळे मॅडम यांनी रेशन माफियांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे आता या ट्रकवरील कारवाई आणि पुरवठा विभागाचा अहवाल काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!