Join WhatsApp group

मुर्तीजापूरमध्ये बोगस बियाण्यांची विक्री? शेतकरी त्रस्त, प्रशासनाकडे कडक कारवाईची आशा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर, १ जुलै — मुर्तीजापुर तालुक्यात बोगस बियाण्यांच्या विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील धनंजय सोळंके नावाच्या शेतकऱ्याने ओस्वाल कंपनीचे सोयाबीन व तूर बियाणे (लॉट नंबर: OCT24-20-339-114) शिवकृपा अ‍ॅग्रो एजन्सी येथून २३ जून २०२५ रोजी खरेदी केले. त्यानंतर २५ जून २०२५ रोजी पेरणी केली. मात्र, आज आठवडाभर उलटून गेला असतानाही बियाण्याला अंकुर फुटलेला नाही, असे त्यांनी कंपनी वर आरोप केले आहे.

धनंजय सोळंके यांनी या घटनेची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असून, अधिकाऱ्यांनी “तुम्ही तक्रार करा, आम्ही पंचनामा करू व पुढील कारवाई करू,” असे आश्वासन दिले आहे. तथापि, यामुळे शेतकऱ्याला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या या लॉटचे बियाणे इतर किती शेतकऱ्यांनी पेरले आहे याची माहिती उपलब्ध नाही. परंतु एक शेतकरी प्रभावित झाल्यानेच ही बाब गंभीर असून इतरही शेतकरी फसवणुकीचे बळी ठरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून बोगस बियाण्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!