Join WhatsApp group

मुर्तीजापूर शहर पोलिसांची गोतस्करांवर धडक कारवाई : गुप्त माहितीच्या आधारे ३,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर (दि. ३० जून) – शहर पोलिसांनी गोमांस तस्करीवर मोठी कारवाई करत एक गाय व दोन गोवंशांना जीवनदान दिले असून, चारचाकी वाहनसह एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २९ जून २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनंतर करण्यात आली.

या प्रकरणात आरोपी जावेद खान अन्सार खानमो. जाकीर मो. नसीर (दोघेही रा. पठाणपुरा, जुनी वस्ती, मुर्तीजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी एमएच HY 7279 या क्रमांकाचे चारचाकी वाहन ताब्यात घेतले असून त्यामध्ये गोवंशांची वाहतूक केली जात होती. यावेळी सदर गोवंशांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले.

ही कारवाई ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश सूर्यवंशी, पीएसआय नितीन राठोड, तसेच हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे, सचिन दांदळे, प्रभाकर नागे, सचिन दुबे, ज्ञानेश्वर राणे, जीवन अंभोरे, पंढरीनाथ पोळे, हरिदास सोळंके आणि सतीश चाटे यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे शहरात गोतस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांतून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!