Join WhatsApp group

लक्ष्मीबाई देशमुख शासकीय रुग्णालयातील रक्त न मिळाल्याने रुग्ण त्रस्त, समाजसेवकाच्या हस्तक्षेपानंतर मिळाले रक्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ३० जून २५ : मुर्तीजापुर : लक्ष्मीबाई देशमुख शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला गेल्या चार दिवसांपासून रक्त मिळत नव्हते. संबंधित रुग्ण दिवसभर रुग्णालयाच्या चकरा घालत होता, मात्र रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे त्याला आवश्यक रक्त वेळेवर मिळाले नाही.

या प्रकारामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. शासकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता नसतानाही, काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नियमांचे उल्लंघन करून रुग्णांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे, अशी स्थानिकांची सुद्धा तक्रार आहे.

दरम्यान, समाजसेवक रवी माडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि थेट रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर आज रुग्णाला आवश्यक रक्त मिळवून देण्यात यश आले.

या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शासकीय रुग्णालयात अशा प्रकारे नियमांची पायमल्ली करून रुग्णांना त्रास देणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!