Join WhatsApp group

कुरुम रेल्वे स्टेशन जवळील १२५ वर्ष जुना पूल लवकरच नव्याने होणार, ग्रामविकास मंत्र्यांसमवेत आमदार हरीश पिंपळे यांची विशेष बैठक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

जनतेचा हितार्थ बारीक लक्ष ठेवणारे आमदार हरीश पिंपळे सदैव सेवेसाठी तत्पर असतात – कुरुमवासियांनी मानले आभार

दिनांक २९ जून २५ : मूर्तिजापूर :

कुरुम ते कुरुम रेल्वे स्टेशन दरम्यान असलेला सुमारे १२५ वर्ष जुना इंग्रज कालीन पूल सध्या अत्यंत जीर्ण स्थितीत असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हरीश पिंपळे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री जयकुमार गोरे यांची विशेष भेट घेऊन संबंधित पूल नवीन बांधण्याची मागणी केली.

या बैठकीदरम्यान आमदार पिंपळे यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवरही चर्चा केली. विशेषत: पूल हा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचे सध्याचे स्थितीमुळे अपघाताचे संभाव्य धोके निर्माण झाले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मंत्री जयकुमार गोरे यांनी पूलाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत, तत्काळ नवीन पूल बांधण्याच्या प्रक्रियेस मंजुरी दिली असून लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले व उर्वरित मुद्दे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन हि दिले.

या निर्णयामुळे कुरुम गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी आमदार हरीश पिंपळे यांचे विशेष आभार मानले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!