Join WhatsApp group

Ads

--

मुर्तीजापूर आठवडी बाजार परिसरात मटन मार्केटचा दुर्गंध : सराव करणाऱ्या खेळाडूंचा आरोग्य धोक्यात! – नगर परिषदेचे दुर्लक्ष

By Sarkarmzanews

June 29, 2025 4:47 pm

Ads

मुर्तीजापूर, ता. २८ जून २५ —
मुर्तीजापूर येथील आठवडी बाजाराच्या दुसऱ्या दिवशी मटन मार्केटमधून उठणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता व आरोग्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. विशेषतः या मार्केटच्या जवळच असलेल्या तालुका क्रीडा संकुल व नागरिक वस्ती असल्यामुळे येथील नागरिक व खेळाडूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बाजार भरल्यानंतर मटन विक्रेत्यांनी मांसाचे अवशेष तसेच रक्तवहिन्या व उरलेला कचरा खुलेआम टाकल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यामुळे साचलेले पाणी आणि त्यात मिसळलेला जैवकचरा रोगराईला आमंत्रण देत आहे. यामुळे मच्छर व इतर कीटक वाढले असून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना झालेली नाही. स्थानिक नागरिक तसेच क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.

प्रशासनाकडे मागणी:

  • मटन मार्केटचा जैवकचरा नियमितपणे उचलणे
  • दुर्गंध रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी

जर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!