Join WhatsApp group

रक्त देऊ या..आशा जागवू या : एकत्रितपणे जीव वाचवू या – रवी माडकर यांचे विनंतीपूर्वक मानवतेसाठी आव्हान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १५ जून २५ : मुर्तीजापुर : आधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात प्रगत झाले असले तरी पण अजूनही मानवी रक्ताला कुठलाही पर्याय  आजपावेतो मानवाला अथवा शास्रज्ञांना सापडला नाही. यासाठी माणसाचे प्राण वाचवण्यासाठी मानसाचेच रक्त लागते. हे आजही जगजाहीर आहे. कुणाला कधी आणि कोणत्यावेळी रक्ताची गरज भासू शकते हे कोणीही सांगू शकत नाही.

“रक्त” हे  प्रत्येक मानवाच्या शरीरात तयार होत असते. रक्तदान ही जीव वाचविण्याची प्रक्रिया आहे आणि जीव वाचवणे नक्कीच सामान्य गोष्ट नाही! ही बाब नागरिकांच्या लक्षात आणून देऊन स्वैच्छिक रक्तदान मोहीम राबविणे महत्त्वाचे ठरते.

आपल्या शरीराला जिवंत ठेवणाऱ्या घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीराचा अविभाज्य घटक असुन संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषक व प्राणवायू (आँक्सिजन)देण्याचे कार्य रक्त करत असते.

स्वैच्छिक रक्तदान…वाचवी रुग्णांचे प्राण…विषयी जनजागृती : 

१)रक्त हे फार काळ टिकवून अथवा साठवता  येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते.

२)”रक्तदान” थँलेसेमिया, हिमोफिलिया ,ल्युकेमिया इ. रुग्णांसाठी “लाईफ लाईन” आहे .अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना कधीही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे…..!

३)अतिदक्षता,प्रसुती,अपघात, रक्तक्षय,अतिरक्तस्राव इ.आदी अशा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्ताची आवश्यकता भासते.अशा रुग्णांसाठी स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे….!

४)आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिट मधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात.(तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी(प्लाझमा),रक्तबिंबीका (प्लेटलेट्स)इ.अशाप्रकारे आपल्या रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण आपण वाचवू शकता.

५) माझ्या रक्तदानाने निश्चितच गरजूंना रक्त पुरवठा झाल्याचे समाधान मिळणार..यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे.!

६) रक्तदानाने….  शरीरातील रक्तदाब,कोलेस्टेराँलचे प्रमाण योग्य नियंत्रण  राहते.

७)   समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते..

८) नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते.

९)रक्तदान केल्यानंतर चोवीस तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या झिज भरून निघते.

१०)रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यासाठी नवचेतना निर्माण होते.

११)शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रक्तदान प्रक्रियेत रक्तदानावेळी सुरक्षिततचे काटेकोरपणे पालन केले जाते.

१२)समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निःस्वार्थीपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवा म्हणून रक्तदान महत्त्वाचे आहे.

१३)निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करु शकता.

यासाठी शासनस्तरावरुन समाजात स्वैच्छिक रक्तदानाबाबत सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम, अभियान, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. सोबतच स्वैच्छिक रक्तदान विषयी नागरीकांमध्ये सामाजिक बांधिलकी, समाजहित, राष्ट्रीयतेची भावना, युवा शक्तीमध्ये रक्तदानाविषयी गैरसमज दूर करून स्वैच्छिक रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, सुदृढ मानसिक आरोग्य, स्वैच्छिक रक्तदानाबाबत समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

यासाठी केंद्र सरकार अंतर्गत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभाग,महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सो.,राज्य रक्त संक्रमण परिषद, धर्मदाय,  सांस्कृतिक/सामाजिक सेवाभावी संस्था , विविध संघटना इ.मार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  स्वैच्छिक रक्तदान शिबिरे तसेच जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. पण शासन स्तरावर जनजागृती मोहीम वेळोवेळी राबविण्यात येते.

आपल्या रक्तदानामुळे, आपण अनेक लोकांचे जीवन वाचवू शकतो. स्वैच्छिक रक्तदान हे सामाजिक कार्याबरोबर कर्तव्य देखील आहे. जे आपल्याला आपल्या समाजात जोपासण्याची गरज आहे.

“रक्तदाता” हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे. “रक्त” हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही तर ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात.यासाठी “रक्तदाता” म्हणून आपण स्वतःहून स्वैच्छिक रक्तदान करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी शासनाच्या घोषवाक्यानूसार “करुया स्वैच्छिक रक्तदान… गरजूं रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी … आशा जागवू… या…!

यासाठी सामाजिक बांधिलकी ठेऊन एकत्रितपणे स्वैच्छिक रक्तदान मोहीम राबवून…. रुग्णांचे प्राण वाचवू या..!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!