Join WhatsApp group

Ads

भातकुलीच्या एकलव्य अकॅडमी ला ठाणेदार राजूलवार यांची भेट

By Sarkarmzanews

June 1, 2025 8:17 pm

Ads

दिनांक ०१ : दिनांक 29 मे ला भातकुली येथील एकलव्य कोचिंग क्लासेस मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये भातकुलीचे दबंग थानेदार रविंद्र राजूलवार सर ( PI ) यांनी मुलांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविले. यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर राजूलवार यांनी मुलांना महत्त्वपूर्ण टिप्स देऊन काही तकनिक सांगितल्या.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती घेतली व आपले सर्व प्रश्न क्लिअर केले भातकुली थानेदार राजुलवार साहेब यांनी मुलांना आवश्यक ती माहिती सांगून संपूर्ण प्रक्रिया व प्रोसिजर कशी असते हे सांगण्यात आले. यामध्ये अभ्यास व ग्राउंड ची तयारी कशी करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले येथे उपस्थित एकलव्य अकॅडमी चे संचालक अश्विन पांडे सर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.


यामध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षक इरफान खान सर हे सुद्धा उपस्थित होते..
“पोलीस भरतीची तयारी करण्याकरिता सातत्य आणि जिद्द चिकाटी खूप महत्त्वाची असते त्यासाठी तुम्ही आवश्यक ते नियम पाडून आपली तयारी सुरू ठेवावी असे सांगण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये भातकुलीची थानेदार रविंद्र राजूलवार साहेब यांनी आमच्या एकलव्य कोचिंग क्लासेस मध्ये येऊन मुलांना मार्गदर्शन केले त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्या मुलांना त्यांच्यापासून भरपूर काही माहिती नक्कीच मिळाली असे व्यक्त करतो.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!