Join WhatsApp group

भाजपाच्या विकास कामाच्या वर आपला झेंडा लावण्याचा प्रकार आमदार साजीद खान पठाण यांनी करू नये – पूर्व महापौर विजय अग्रवाल यांनी लावला आरोप

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 21 -अकोला(प्रतिनिधी) – भाजपा लोकप्रतिनिधी व अकोला शहराच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोकप्रिय नेते स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांनी जुन्या शहरातील डाबकी रोड रस्त्यासाठी विशेष निधी आणून डाबकी रोड रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विकास साधला त्या विकासाचा श्रेय खोटा घेण्याचा व भाजपाच्या विकास कामाच्या वर आपला झेंडा लावण्याचा प्रकार आमदार साजीद खान पठाण यांनी करू नये.

खोट्या प्रसिद्धीसाठी भाजपची नक्कल करण्याचा काम करू नये असाही सल्ला भाजपा नेते माजी महापौर विजय अग्रवाल यांनी दिला.

एक कवडी शासनाकडे निधी न मागता पाठपुरावा न करता खोट्या कामाचा श्रेय घेण्याचा प्रकार भाजपा लोकप्रतिनिधी जातात तिथे जाण्याचा प्रकार व आपण केला असा प्रकार दाखवण्याचा प्रताप सातत्याने आमदार साजिद खान पठाण चमकोगिरी करीत असल्याचा आरोप भाजप नेते विजय अग्रवाल यांनी केला आहे.

जुन्या शहरातील डाबकी रोड वाशी हे सातत्याने भारतीय जनता पक्षाचे मतदार असून त्यांचा प्रेम विश्वास सातत्याने गेल्या 35 वर्षापासून भाजपावर असून संकटकाळी सुद्धा भाजपाच्या पाठीशी उभे राहिले त्या भागामध्ये आमदार गोवर्धन शर्मा यांना नगरसेवक म्हणून त्यांनी विजय केला तसेच सातत्याने त्या भागात लोकप्रतिनिधी म्हणून भाजपाचे लोकप्रतिनिधी निवडून येतात.

त्या भागातील नागरिकांचा समस्या दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न व सातत्याने सुखदुःख होण्यात मध्ये सहभागी होण्याची परंपरा भाजपा नेते गोवर्धन शर्मा संजय भाऊ धोत्रे भाऊसाहेब फुंडकर आमदार रणधीर सावरकर सातत्याने करीत आहे.

त्यांच्या परंपरेला त्या भागातील नगरसेवक सतीश ढगे विलास शेळके स्वर्गीय गणेशराव ढगे, सारखे लोकप्रतिनिधी करीत असतात त्यांच्या प्रयत्नाला महायुतीचे कार्यकर्ते विकास कामाला गती देत असतात.

त्या कामाचा श्रेय घेण्याचा प्रताप जुन्या शहरात डाबकी रोड चा रस्त्याचा काम गेल्यास पाच महिन्यापासून सुरू आहे त्या कामाचा शुभारंभ करण्याचा व चमकोगिरी करण्याचा प्रकार आमदार साजिद खान पठाण करत असून अकोल्यासाठी निधी आणायचं नाही निधीमध्ये अडथळे निर्माण करायचं असा प्रताप सातत्याने ते करीत असतात गेल्या पाच महिन्यापासून ते झोपले होते का असाही सवाल अग्रवाल यांनी केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर त्यांना जाग आली आहे. त्यामुळे असा प्रकार करत असले तरी अकोल्यातील जनता सुजाण आहे भाजपा लोकप्रतिनिधी केलेलं काम व सातत्याने सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा कोणाची आहे हे जनतेला माहित आहे.

त्यामुळे त्यांची नाटक अकोलेकरांना माहित आहे असेही विजय अग्रवाल यांनी सांगितले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!