Join WhatsApp group

वासुदेव महल्ले यांची राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कारा साठी निवड.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

शेतीपूरक दुग्धउद्योगातील योगदानाची राज्यस्तरीय पातळीवर दखल. २४ मे रोजी शेताच्या बांधावर पुरस्कार वितरण.

दिनांक २० – अकोला : कृषी आणि दुग्धउद्योग क्षेत्रात आपल्या नवोन्मेषी कार्याने विशेष ओळख निर्माण करणारे आकोल्याचे प्रगतशील उद्योजक ह. भ. प .वासुदेव महल्ले यांची राजीव गांधी राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, अमरावती यांच्यातर्फे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि उद्योजकांचा सन्मान करण्यात येतो. सन २०२५साठी वासुदेवराव महल्ले यांची निवड होणे, हा आकोला जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
गत चार दशकांपासून ‘पाटील दूध अँड स्वीट्स’ या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन, वितरण, गुणवत्ता नियंत्रण यामध्ये महल्ले यांनी उभारलेले योगदान राज्यभर आदर्शवत मानले जाते. त्यांनी विकसित केलेल्या दुग्धउद्योगाचे सेंद्रिय शेतीला खत पुरवठा करण्याचे चक्र, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहे. त्यामुळे शेतीपूरक उद्योग म्हणून त्यांच्या कार्याची सखोल अभ्यासानंतर पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे व संचालक मंडळाने महल्ले यांचे अभिनंदन करून हा पुरस्कार त्यांच्या आकोला येथील पाटील डेअरी फार्म गीता नगर, अकोली खुर्द सोमठाणा रोड अकोला येथील शेताच्या बांधावर, २४ मे रोजी सकाळी ९ वाजता, महाराष्ट्रातील नामवंत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्याचे ठरविले आहे. हा आगळावेगळा सोहळा म्हणजे ग्रामीण शेती, दुग्धव्यवसाय व उद्योग यांचे जिवंत उदाहरण ठरणार आहे.
या सन्मानप्राप्त सोहळ्याला कृषिप्रेमी, सहकारी, उद्योजक, कीर्तनकार, प्रवचनकार व महल्ले यांच्या शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, व श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था व महल्ले परिवारातर्फे करण्यात आले आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!