Join WhatsApp group

साहित्य विहार संस्थे तर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय मराठी वाड्मय पुरस्कारांसाठी साहित्याचे आवाहन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १८ – अकोला साहित्य विहार संस्थेतर्फे साहित्य क्षेत्रातील मानाचे प्रथितयश पुरस्कार दिले जाणार असून संस्थेतर्फे लेखकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुरस्कारांचा तपशील:- कविता संग्रह,कथा संग्रह, गझल संग्रह, सामाजिक कादंबरी, वैचारिक कादंबरी,चरित्र कादंबरी, संत चरित्र, वैचारिक लेख संग्रह, समीक्षा ग्रंथ,ललित लेख संग्रह,कुमार साहित्य,नाट्यकृती, प्रवास वर्णन, संकीर्ण,अनुवादित ग्रंथ,माहितीपर संदर्भ ग्रंथ. इत्यादी साहित्य प्रकारां मधील साहित्य स्वीकारण्यात येईल.


पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, गौरवचिन्ह, सन्मानपत्र, आणि ग्रंथभेट दिली जाईल.विजेत्यांनी पुरस्कार सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रत्येक साहित्य प्रकारातील पुस्तकाच्या दोन प्रती, एक फोटो, पूर्ण पत्ता पिनकोड, फोन नंबर सहित,आशा पांडे अध्यक्ष साहित्य विहार संस्था ५३ सांजवात,खरे टाऊन धरमपेठ नागपूर ४४००१० येथे १००/- रु. प्रवेश शुल्कासह 31 जुलै पर्यंत पाठवावे . पुस्तक प्रकाशन अवधी जुलै 2024 ते जुलै 2025 असावा. पुरस्कार समारंभ नोव्हेंबर मधे घेण्यात येईल . अधिक माहितीसाठी आशा पांडे मो क्र.9422207925.किंवा मंदा वाघमारे खंडारे
7756974791यांचेशी संपर्क साधावा.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!