Join WhatsApp group

पंचकोष जपणारा ‘धमाल गल्ली” कार्यक्रम हाऊसफुल्ल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकॅडेमिक हाईट्सने सादर केले ‘जॉयफुल लर्निंग’चे उत्कृष्ट उदाहरण

मूर्तिजापूर: येथील प्रख्यात सीबीएसई प्रशाला अकॅडेमिक हाईट्स ने आयोजित केलेल्या “धमाल गल्ली” या ज्ञान व संस्कृती जोपासणाऱ्या खुल्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद देत मूर्तिजापूरकरांनी अगदी ‘हाऊसफुल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.ग्रामीण भागातसुद्धा मोबाईलचे लोण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असतांना शालेय व्यवस्थापनाने ‘ जॉयफुल लर्निंग’ साठी विशेष प्रयत्न करणे अत्यावश्यक ठरत आहे.

राष्ट्रीय शिक्षण नीतीनुसार प्रत्येक शाळेला ‘बॅगलेस स्कूल’ ही संकल्पना राबविण्यास शासन आग्रह धरत आहे. यानुसारच अकॅडेमिक हाईट्सचे प्राचार्य डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून क्रिडा, कला,ज्ञान,संस्कृती,सुप्तगुण यावर आधारित पंचकोष विकसित करणारा आगळा वेगळा ‘धमाल गल्ली’ कार्यक्रम आयोजित केला.

यामध्ये बैलगाडी, घुडसवारी सह मलखांब, टायर, कंचे, लगोरी, डीग्गर, विटी दांडू, भालाफेक, धनुर्विद्या या भारतीय खेळांसमवेत क्रिकेट,व्होली बॉल,हँडबॉल,कॅरम,बुद्धिबळ, रिंग,शॉटपुट,डिस्क थ्रो या पाश्चात्य खेळांचा समावेश होता. प्राध्यापक नरेंद्र गाढे व चमूने सादर केलेल्या मलखांबच्या प्रात्यक्षिकाने तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यांनी प्रस्तुत केलेल्या फायर शो ने सर्वजण स्तब्ध झालेत. सुप्त गुणांना वाव देण्यासाठी टॅटू, मेहंदी, ड्रॉईंग, हर्डल आदींचा समावेश होता.

विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यासाठी डान्स, कराओके सिंगिंग,कार्टून शो, प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्ञानवर्धन व मनोरंजन या दोन गोष्टींचा विचार करत तीन तासांच्या या कार्यक्रमाला सर्व शाळांमधून विद्यार्थी व पालकांचा मोठा जनसमुदाय उसळला होता. या कार्यक्रमास मान्यवर म्हणून राम दर्याणी, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी, सामाजिक कार्यकर्ते विष्णू पाटील लोडम, स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या प्राचार्या सौ प्रचिती धर्माधिकारी, लिटिल फ्लॉवर च्या प्राचार्या सौ. रेणुका कांबे उपस्थित होते.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी शिवनाणारायन,सौ.विष्णुप्रिया,सौ. सुलक्षणा देशमुख, कौशिक भट्टाचार्जी, इतर शिक्षक,पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षकेतर व सहायक कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. अध्यक्ष अशोक दर्याणी व संचालिका रिया दर्याणी यांनी मूर्तिजापूर शहरात जॉयफुल लर्निंगसाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष प्रयत्नाचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!