Join WhatsApp group

पीएमश्री स्व रामदास भैय्या दुबे न.प. शाळेच्या शाळा सुधार योजनेत दानशूर व्यक्तींचा सहभाग

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०३ : मुर्तीजापुर : आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल स्कूल पीएमश्री स्व. रामदास भैय्या दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा मूर्तिजापुर जिल्हा अकोला या शाळेमध्ये शाळा सुधार योजना राबविण्यात येते. शाळा सुधार योजनेमध्ये मूर्तिजापुर शहरातील दानशूर व्यक्तींनी आतापर्यंत 6 लाख रुपये वर्गणी प्राप्त झालेली आहे.

दरवर्षी या रकमेमध्ये वाढ होत आहे तरीही मूर्तिजापूर शहरातील दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांचे आई-वडील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला देणगी देऊन शाळेत सुधार योजनेमध्ये सहभाग घ्यावा.


शाळा सुधार योजनेची रक्कम बुलढाणा अर्बन बँक मध्ये डिपॉझिट स्वरूपात ठेवून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी विद्यार्थ्यांना स्कूल बॅ, नेलकटर, वही, पेन, पेन्सिल, पाणी बॉटल, बास्केट, अंकलीपी, स्वाध्याय पुस्तिका इत्यादी साहित्य त्यांना दरवर्षी 15 ऑगस्ट पूर्वी शाळा सुधार योजनेचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते.

या कार्यक्रमासाठी शाळा सुधार योजनेतील सर्व देणगीदारांना दानशूर व्यक्तींना सुद्धा निमंत्रित केले जाते. आपण दिलेल्या देणगीचा सदुपयोग व्हावा यासाठी सर्व मूर्तिजापुर शहरातील व्यक्तींना पुन्हा आव्हान करण्यात येते की त्यांनी या योजनेमध्ये सहभाग घ्यावा व शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजूवंत गरीब विद्यार्थी यांना सहकार्य करावे ही विनंती.

आज दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी स्व सत्यनारायण बेणीप्रसाद दुबे 5000 माजी न प उपाध्यक्ष स्व.रामकिसन सत्यनारायणजी दुबे 5000 माजी शिक्षण सभापती स्व.सुभद्राबाई रामकिसन दुबे 5000 तर्फे श्री संतोष भैय्या दुबे यांचे कडून शाळेला आजोबा वडील आई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 15000/- रुपये देणगी शाळेला प्राप्त झाली. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार…..


Share

Leave a Comment

error: Content is protected !!