Join WhatsApp group

Ads

१९ खेळाडू तायकोंडो बेल्ट ग्रिटेशन परीक्षेत पास

By Sarkarmzanews

February 3, 2025 6:39 pm

Ads

दिनांक ३ : ठाणे : दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी खेलो तायकोंडो युथ स्पोर्ट असोसीएशन, महाराष्ट्र व शिवराज स्पोर्ट क्लब आणि गुणवंत तायकोंडो ऐकडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तायकोंडो बेल्ट ग्रिटेशन परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत एकूण १९ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. त्या मध्ये १)आरव कदम २)स्वारीत मंदिरे ३)राज शिंदे ४)विराज सिंग ५)ओम साहू ६) शार्दुल गुंजाळ ७)सहर्ष सांगळे ८)पीयूष सावंत ९) दीक्षांत जाधव १०) स्लोक तिवारी ११)शिव शर्मा १२)मानवी शर्मा १३)श्रावणी कदम १४)सलोनी कदम १५)स्वरा पेस्ट १६) किंजल लवाटे १७)दिया गांगरवर १८)मंजिरी कोकरे १९)शौर्य यादव या सर्व खेळाडू उपस्थीत होते.
या परीक्षेला परीक्षक म्हणून खेलो तायकोंडो युथ स्पोर्ट्स असोसीएशनचे अध्यक्ष बंडूपंत लोखंडे उपस्थितीत होते . यांचा मार्गदर्शनात हि परीक्षा सेंट मेरी स्कूल, दिवा जिल्हा ठाणे येथे पार पडली.
या स्पर्धेकरिता मुख्य मार्गदर्शक गणेश सागर सर (सचिव – खेलो तायकोंडो युथ स्पोर्ट असो) मुख्य प्रशिक्षक अमर प्रभाकर तळोकार, बबलू बहोरिया, नितेश बहोरिया, रमेश बहोरीया, यांच्या मार्गदर्शनात पार पडली. तसेच सेंट मेरी स्कूलचे अध्यक्ष रवी पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!