Join WhatsApp group

Ads

वैष्णवी सोनोने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By Sarkarmzanews

January 29, 2025 8:34 pm

Ads

दिनांक २९ : अमरावती : नुकत्याच डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती मध्ये अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये पाच जिल्ह्याचे महाविद्यालयाचे महिला पैलवान त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स ची प्रथम वर्षाची विद्यार्थीनी कुमारी वैष्णवी गजानन सोनोने हिने 68 किलो वजन गटात सहभाग घेतला होता.

अत्यंत चुरशीच्या स्पर्धा करून भाग्यश्री खेडकर खामगाव हीला पराजित करून प्रथम क्रमांक मिळवला आणि तीची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत स्पर्धेसाठी निवड झाली आणि ह्या स्पर्धा गुरु काशी विद्यापीठ भठिंडा पंजाब येथे निवड झालेली आहे कु.वैष्णवी सोनोने ही श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागामध्ये डॉ संजय तिरथकर यांच्या मार्गदर्शनात सराव करते हे आपल्या यशाचे श्रेय तिच्या आई-वडील गजानन सोनोने व छाया सोनोने तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सुदान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव डॉ. माधुरी शेळके श्रीकांत चेण्डके , ॲड.प्रशांत देशपांडे, प्रा .रवींद्र खांडेकर, डॉ. तनुजा राऊत व समस्त गुरुजनांना देते

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!