दिनांक २५ : अकोला : जन्म व मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेनंतर अकोला जिल्ह्यात उशिरा जन्म प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची छाननी केली पाहिजे.
असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना चर्चेदरम्यान सुचविले असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी येथे दिली.
अकोला जिल्ह्यात उशिरा जन्म प्रमाणपत्रासाठी १५ हजार ८४५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १० हजार २७३ अर्जदारांना जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. वितरित करण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रांसोबतच जन्म प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाची छाननी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असून शासनाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत आता नवीन जन्म प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार नाही, असेही सोमय्या यांनी सांगितले.