Join WhatsApp group

अकोला जिल्हा परिषदेचा व सात पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपला.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १६ :अकोला : जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांचा कार्यकाळ बुधवार ता. १५ जानेवारी रोजी संपुष्टात आला असून जिल्हा परिषदेचा कार्यकाळ गुरुवार ता. १६ रोजी संपला आहे. दरम्यान राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यासंदर्भात बुधवार ता.१५ रोजी आदेश काढून जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तर पंचायत समितीवर विडीओंची नियुक्ती करण्याबाबत निर्देशित केले आहे.

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही जानेवारी २०२० मध्ये पार पडली होती. दरम्यान आज १६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषदेचा संपुष्टात येणार आहे. कार्यकाळ दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुदतवाढी संदर्भात पदाधिकारी आग्रही होते. मात्र बुधवार १५ जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाने आदेश काढून प्रशासक नेमण्यात संदर्भात निर्देशित केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विहित कालमर्यादत घेणे शक्य नसल्याबाबत शासनाला यापूर्वीच कळविले असून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत देखील आदेशात नमूद आहे.

बिडीओची प्रशासक म्हणून नियुक्ती

अकोला, बार्शीटाकळी, मूर्तीजापुर, बाळापुर, अकोट, तेल्हारा व पातुर या सात पंचायत सिमिती चा कार्यकाळ बुधवार ता. १५ जानेवारी रोजी संपला आहे. दरम्यान ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार संबंधित बिडीओची प्रशासक म्हणून जि.प प्रशासनाने नियुक्ती केली आहे. याबाबत बुधवारी रात्री उशिरा नियुक्तीचे आदेश जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आजपासून पंचायत समितीवर प्रशासकराज असणार आहे.

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ आज संपला

■ जिल्हा परिषदेचा कार्यकाळ गुरुवार ता. १६ जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार सीईओ यांची प्रशासक म्हणून आज नियुक्ती झाली आहे . दरम्यान प्रशासनाच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांचा स्नेहमीला सोहळा आयोजित केला होता.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!