Join WhatsApp group

मुर्तीजापुर शहरात दोन तासात मंगळसूत्र चोरीचा तीन घटना

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : दिनांक १५ : मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरात हळदी कुंकू चा कार्यक्रमा निम्मित महिला वर्ग घराचा बाहेर पडत आहे, याच गोष्टी चा फायदा उचलत मंगळसूत्र चोरट्यांनी मुर्तीजापुर शहरात धुमाकूळ घातला आहे.

मुर्तीजापुर शहरात आज सायंकाळी ६ ते ८ वाजता दरम्यान मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना लागोपाठ घडल्या आहे. चोरट्यांनी पहिले डीपी रोड वर डॉक्टर शेळके यांचा दवाखान्या जवळ राणी सचिन खोकले हि महिला पैदल जात असताना चोरटे स्वतचा दुचाकी गाडी वर आले व या महिलेचे मंगळसूत्र खेचून पसार झाले.

त्या नंतर स्टेशन विभाग, मस्जिद जवळ, उमा देविदास बांगळ हे आपल्या दुकानात असताना दोन चोरटे त्यांचा दुकाणा जवळ आले व एक चोरट्याने दुकानात काही वस्तू विकत घेतली व दुसरा दुचाकी सुरु करून उभा होता. उमा देविदास बांगळ हे त्या चोरट्याला पैसे परत देत होती त्यांचे लक्ष पैसे मोजण्यात होते तेवढ्यात चोरट्याने त्यांचा मंगळसूत्र खेचला व तेथून पसार झाले.

नंतर पोलीस, स्टेशन विभाग मस्जिद जवळ घटना स्थळी दाखल झाले विचार पूस सुरु असतना चिखली गेट वरून आणखी एक उज्वला प्रशांत बलींगे यांचे सुद्धा मंगळसूत्र दोन चोरटे खेचून पसार झाले. या घटने मुळे महिला वर्गात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुर्तीजापुर शहर पोलीसांनी सध्या या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली असून शहरातले cctv कॅमेरे चेककरत असून फिर्यादीनचे जबाब नोंदवित आहे.

अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!