Join WhatsApp group

पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्युज डेस्क : दिनांक १४ : पुणे : वाद-विवादातून पत्नीवर चाकूने सपासप वार करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसीमा मुल्ला (वय ३२), अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. चेंबूर, विष्णूनगर, मुंबई) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश कचरु लंके (वय ३६, रा. ग्रॅव्हेंटाइन हाॅटेल, ज्युपिटर हाॅस्पिटलशेजारी, बाणेर) यांनी चतु:शृंगी (बाणेर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमजद मुल्ला टेम्पोचालक आहे. त्याची पत्नी नसीमा हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. नसीमाचे नातेवाईक बाणेर भागात राहायला आहेत. नसीमा आणि अमजद नातेवाईकांना भेटायला पुण्यात आले होते. बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये ते उतरले होते. सोमवारी (१३ जानेवारी) सकाळी दोघांमध्ये हॉटेलच्या खोलीत वाद झाले. नंतर अमजदने पत्नी नसीमावर चाकूने वार केले. अमजदने स्वत:च्या गळ्यावर, तसेच पोटावर चाकूने वार केले. दोघे जण गंभीर जखमी झाले.

हाॅटेलमधील खोलीत सुरू असलेला आरडाओरडा ऐकून कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. जखमी अवस्थेतील मुल्ला दाम्पत्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात अमजदने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण अधिक तपास करत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!