Join WhatsApp group

Ads

इरफान खान यांची अमरावती विद्यापीठ च्या कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड

By Sarkarmzanews

January 8, 2025 12:55 pm

Ads

अमरावती : दिनांक ८ : ९ जानेवारी ते १२जानेवारी २०२५ यादरम्यान गुरू काशी विद्यापीठ भटिंडा पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मुलांचा कुस्ती संघाचा इरफान खान यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे .

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ च्या कुस्ती विभागात विद्यापीठ संघाच्या कुस्तीगरांना अतिशय चांगल्या अत्यंत चांगल्या प्रकारे आंतरराष्ट्रीय कुस्ती गादीवर वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण दिले. इरफान खान हा भातकुली तालुका कुस्ती संघाचा अध्यक्ष आहे. भातकुली तालुक्यामध्ये कुस्तीचा विकास व्हावा प्रचार व्हावा म्हणून वेगवेगळ्या गावात जाऊन कुस्तीचे महत्व सांगून व सभेचे आयोजन भातकुली तालुक्यातील कुस्तीगिरांना सरावा करता दहा लाख रुपये ची मॅट आमदार रवी राणा यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिली. आणि ती मॅट वेगवेगळ्या तालुक्यात नेऊन तिथे यशस्वीरित्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन सुद्धा इरफान खान करत असतो व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहकार्याने महात्मा ज्योतिबा फुले वाणिज्य वविज्ञान महािद्यालयात आदिवासी आश्रम शाळेचा विद्यार्थी व तेथील स्थानिक मुलांना कुस्तीचे मोफत प्रशिक्षण देतो.

इरफान स्वतःही उत्कृष्ठ कुस्तीपटू होता. इरफान खान चे विद्यापीठाच्या कुस्ती संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल भातकुली तसेच अमरावती जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ऑल इंडिया इंडियन सिटी स्पर्धेतून निश्चित मेडल आणण्याची आश्वासन सुद्धा ही कुस्ती मार्गदर्शक इरफान खान यांनी दिलेले आहे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर रावजी वैद्य, डॉ माधुरी चेन्डके, डॉ श्रीकांत चेन्डके, एडवोकेट प्रशांत विदर्भ केसरी डॉ संजय तिरथकर, प्रा डॉ.प्रल्हाद राऊत , योगेश गुढदे, प्रशांत अडसोड, अभय माथणे मन्नान शेख, समीर देशमुख, शेख जुबेर, व समस्त जेष्ठ पैलवानानी अभिनंदन केले

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!