Join WhatsApp group

Ads

राष्ट्रीय रस्सीखेच (Tug of war) स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा खेळाडूंची रिया कपाटे हिला कास्यपदक

By Sarkarmzanews

January 7, 2025 9:57 pm

Ads

बुलढाणा : दिनांक ०८ : टग ऑफ वार फेडरेशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या अधिपत्याखाली उन महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशन यांच्या वतीने दिनांक २ ते ४ जानेवारी २०२५ दरम्यान चिंचणी बीच समुद्रकिनारा बोईसर जिल्हा पालघर येथे ३६ वी राष्ट्रीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

त्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक गुणवंत क्रीडा पुरस्कार प्राप्त श्रीराम निळे यांच्या. महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी निवड होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने वजन गट ५०० किलोग्राम मध्ये सुवर्णपदक पदक पटकावले तर ३८० किलोग्रॅम मुलींच्या संघाने कास्यपदक पटकावले मिक्स कॅटेगरीमध्ये ४४०किलोग्राम मध्ये चौथ्या नंबर मिळवला.

त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याची खेळाडू रिया कपाटे हिला ३८० किलोग्रॅम वजन गटामध्ये कास्यपदक मिळाले बुलढाणा जिल्हा Tug of war असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीशेषनारायण लोंढे, सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडूचा प्रशिक्षक श्रीराम निळे, कोषाध्यक्ष योगेश शर्मा, राजकुमार शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकार, माधव मंडळकर, बाळकृष्ण जाधव, दिलीप यंगड, दीपक माठे यांनी कुमारी रिया दिगंबर कपाटे हीचे अभिनंदन केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!