Join WhatsApp group

Ads

17 वर्षा आतील मुला मुलींचा (बॉक्सिंग ) महाराष्ट्र राज्याचा संघ अकोला येथून ( दिल्ली )येथे रवाना. अकोल्याचे 09 बॉक्सिंग खेळाडूंचा समावेश.

By Sarkarmzanews

December 6, 2024 7:25 pm

Ads

अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला द्वारा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दि. 02 ते 06डिसेंबर 2024 दरम्यान करण्यात आले होते.

सदर 17 वर्षातील मुले – मुलींचा राष्ट्रीय बॉक्सिंग संघ दिल्ली येथे दि. 8 ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सदर राष्ट्रीय बॉक्सिंग मुलांच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंचे नावे पुढील प्रमाणे आहेत – 1) शाह असद मुमशाद अली ,(मुंबई ),2) प्रयोद राजपुत (पुणे ), 3) उदय घोरपडे ( (पुणे ), 4) स्मित राजपूत (अकोला,क्रीडा प्रबोधिनी ), 5) रिजवान शाह सलीम शाह ( अकोला, क्रीडा प्रबोधिनी ), 6) कबीर साळवे ( छ. संभाजी नगर ), 7) सुरज सोनवणे (छ. संभाजी नगर ), 8) राज शिंदे (सातारा ) 9) मयुरेश जाधव ( सातारा ), 10) अथर्व भट्ट ( अकोला, क्रीडा प्रबोधिनी ), 11) हर्षवर्धनसिंग डुलगच ( छ. संभाजी नगर ), 12) सोहेल खैरुवाले ( अकोला ), 13) आर्यन मोहिते (रायगड )
निवड झालेला मुलींचा संघ पुढील प्रमाणे – 1) कु. सृष्टी चोरगे ( पुणे ), 2) कु. दुर्पता साऊद (मुंबई )3) कु. समीक्षा सोळंके ( अकोला,क्रीडाप्रबोधिनी ) 4) कु. झिनत शेख ( पुणे ) 5) कु. सुहानी बोराडे ( अकोला, क्रीडा प्रबोधिनी ) 6) कु.सृष्टी धोडमिसे ( छत्रपती संभाजी नगर ), 7) कु.नमस्वी अंभोरे ( छत्रपती संभाजी नगर ), 8) गार्गी राऊत ( अकोला, क्रीडा प्रबोधिनी ), 9) कु. निवेदिता भुतडा ( अकोला, क्रीडा प्रबोधिनी ), 10) कु.मार्दवी भोसले ( मुंबई ), 11) कु.सानवी महाजन ( भंडारा ), 12) कु. समृद्धी भोंगे ( बुलढाणा ),13)कु. माहेश्वरी चोपडे (जळगांव ), 14) कु. भक्ती चुंगडे,(अकोला, क्रीडा प्रबोधिनी )15) कु. कोमल गिरी ( मुंबई )

मुलांचा संघाचा प्रशिक्षक म्हणून गजानन कबीर हे आहेत तर मुलींच्या संघांचे महिला प्रशिक्षक म्हणून श्रीमती लता इंदूरकर राहणार आहेत. तर संघ व्यवस्थापक म्हणून सुकन्या सुर्वे व लक्ष्मण कोळी हे संघासोबत राहणार आहेत.निवड झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडूंना मा. जिल्हाधिकारी श्री.अजित कुंभार सर यांनी शुभेच्छा देऊन विजयी होऊन महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून आणण्याचा आशीर्वाद दिला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीश्चंद्र भट्ट व क्रीडा अधिकारी श्रीमती मनीषा ठाकरे यांनी सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या तसेच बॉक्सिंग परिवाराच्या सर्व सदस्यांनी सर्व राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!