Join Whatsapp

व्यवसायिकांना एलपीजी सिलिंडरची दरवाढीचा फटका

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क: मुंबई दिनांक २: भारतीय तेल विपणन कंपन्यांनी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस कमर्शियल सिलिंडरच्या दरामध्ये १५ ते १६ रुपये वाढ केली आहे. आजपासूननवा महिना सुरू झाला असून डिसेंबर महिना सुरू होताच गॅस सिलिंडरचे दर महागले आहेत.

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशीएलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्याअंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी करण्यात आली असून सामान्य एलपीजी म्हणजेच घरगुती १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेलानाही.

व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून देशभरात लागू झाले आहेत. देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांपैकी फक्त कोलकाता येथे गॅस सिलिंडर सर्वाधिक दरात उपलब्ध आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर सलग पाच महिन्यांपासून वाढत आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती ऑगस्टपासून सातत्याने वाढत आहेत आणि डिसेंबरसह सलग पाच महिने १९ किलो गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!