Join Whatsapp

बोरगाव मंजू हद्दीत वर्ली मटका जोरात, पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : दिनांक ३० : गेल्या काही वर्षात तरुणाई मध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमविण्याचा मानसिकते मुळे अनेक तरुणांचा कल वाढला आहे, त्याचाच फायदा घेत बोरगाव मंजू शहरात वर्ली मटका या अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे, सध्या बोरगाव मंजू वर्ली मटक्याचे केंद्र स्थान सुद्धा बनले आहे.

तरुणांचा या अवैध्य धंद्या कडे वाढलेला कल आणि पोलीस प्रशासना कडून दिलेली सुट म्हणजेच दुर्लक्ष या मुळे अवैध धंदा करणार्या मालकांना जणू काही मोकळे रान मिळाले आहे. दरम्यान बोरगाव मंजू गावात वर्ली मटका या धंद्याला पूर आलेला दिसत आहे, बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचा अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात वर्ली मटक्याची दुकाने खुले आम सजलेली दिसत आहे. मात्र पोलीस प्रशासना कडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे.

वर्ली,सट्टा मटका, हे धंदे सर्रासपणे सुरु आहेत मात्र पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? कुठे तरी पाणी मुरत आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वर्ली मटक्या मुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. पैसा नसला तर वर्लीचे आकडे मांडण्यासाठी तरुणाई चोरी करायला सुद्धा घाबरत नाही अशी परिस्थिती सध्या आलेली आहे.

त्यामुळे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचा हद्दीत येणाऱ्या गावां मध्ये नागरिकात पोलिसांन बद्दल नाराजीचे सुर उमटत आहे,बोरगाव मंजू पोलिसांनी खुलेआम वर्ली मटका चालवनार्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकान कढून होत आहे. परंतु पोलीस प्रशासन कुठे तरी कमजोर झाल्याचे चित्र दिसत आहे.

आता बोरगाव मंजू शहरात हे धंधे कोणाचे व याचे खरे सूत्रधार कोण हे सगळ्यांना माहित असल्यामुळे ,यांचे नांव घेणे याला अर्थ नाही.

सरकार माझा न्यूज – लोकहितार्थ अर्पण……


Share

Leave a Comment

error: Content is protected !!