Join Whatsapp

अकोला महानगरपालिका – जन्म,मृत्यु नोंद विभागा मध्ये एजंटानचा राज

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : अकोला, दिनांक २९ : माणुस जन्माला आल्या पासून ते मृत्यू झाल्यानंतर घरचा लोकांना दोन वेळेस तरी या विभागा मध्ये जन्म,मृत्युची नोंद करण्यासाठी जावे लागते.

आपण जर जन्म,मृत्यु नोंद करण्यासाठी अकोला महानगरपालिका मध्ये जात असाल आणि आपल्याला जन्म,मृत्यु दाखला किंवा या मध्ये फेरबदल करण्याची असा प्रमाणपत्र लवकर हवा असेल तर या विभागाचा बाहेर काही स्त्री व पुरुष एजंट आपल्याला नक्की भेटणार, आपल्याला जर लवकर गरज असेल तर हि मंडळी तुमचे ८ दिवसात होणारे काम १ दिवसात करून देते व त्या बदल्यात कामा प्रमाणे व वेळे प्रमाणे पैसे मोजते.

अधिकारी वर्गा वर कामाचा जास्त ताण असल्या मुळे अकोला महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या जन्म,मृत्यु नोंद विभाग मध्ये काही एजंट लोकांनी कारभार आपल्या हातात घेतल्याचे चित्र सध्या महानगरपालिका मध्ये दिसत आहे, यांचा वर कोणाचा दबाव नाही का ? कि जाणीवपूर्वक या एजंटाना दुर्लाक्षित केले जात आहे ? या एजंटाना अशी कोणती जादू जमते ज्या मुळे घंटो का काम मिनटो मे शक्य आहे? कि फक्त काही आर्थिक मोहाला बळी पळून नागरिकांचा कामाला जाणून संबधित अधिकारी वर्गा कळून लांबविले जाते अशी चर्चा जनते मध्ये पाहण्यास मिळत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!