Join WhatsApp group

मूर्तिजापूर शहर झाले चोरट्याचे माहेर घर, ४८ तासात दोन चोरीचे गुन्हे दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापुर दिनांक २९ : मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत ४८ तासात दोन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहे, दिनांक २८ नोव्हेंबर २४ रोजी रात्री ३ ते ४ वा दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी स्टेशन विभागातील एक दारूचे दुकान फोडून २७,५०० रुपयाची दारू तर ४०,००० रुपये अशी रोख रक्कम लंपास केली. हे दुकान शहराचा मुख्य रस्त्यावर असून चोरट्यांनी एक तास सर्कस करून हे दुकान फोडल्याचे समजते. या समोर सिविल लाईन असून प्रशासनाचे उच्च अधिकारी यांचे येथे निवास स्थान आहे.

तसेच काल भर दिवसा काही अज्ञात चोरट्यांनी तिडके नगर येथे अजय भेंडे यांचे घरी भाड्याने राहत असणार्या प्रदीप देवेंद्र मुंदे यांचा घरी आपली कला दाखवताना सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम असे एकूण 1,93,100 चा मुदेदमाल लंपास केले.

चोरट्यांनी कदाचित मुर्तीजापुर शहराला आपले माहेर घर तर नाही बनविले ? पोलिस प्रशासन २४ तास कटिबद्ध असताना पण ४८ तासात दोन चोर्या शहरात कसे काय शक्य आहे? आपले कर्तव्य सोडून पोलिस प्रशासन अजून कुठे तर गुंतला नसेल ना? शहर पोलीस स्टेशन मधील डी.बी. पथक सध्या कुठे लक्ष देत आहे? अश्या चर्चा सध्या शहरात खूप रंगल्या आहे.

सरकार माझा न्यूज – लोकहितार्थ अर्पण…..


Share

Leave a Comment

error: Content is protected !!