Join WhatsApp group

जागतिक विश्वपदक विजेता साक्षी गायधनी यांच्या हस्ते राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा -अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालाय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 22 ते 27 नोव्हेंबर 2024 दरम्यान करण्यात आले.

सदर राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 14 वर्षे मुले, 17 वर्षे मुले व मुली, तसेच 19 वर्षे आतील मुले व मुली या वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रातून अमरावती विभाग, मुंबई विभाग, कोल्हापूर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग, लातूर विभाग, नागपूर विभाग, नागपूर विभाग व क्रीडा पीठ इत्यादी विभागातून एकूण 585 खेळाडू सहभाग घेतील.

स्पर्धा उद्घाटन करिता जागतिक विश्वपदक विजेता साक्षी गायधनी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी शत्रुघ्न बिरकड, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कारार्थी हरिवंश टावरी, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंच विजय गोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे, जिल्हा संघटक राजेश गावंडे , रा.क्री.मा. विजय डोबाळे ( चंद्रपूर ), बॉक्सिंग संघटनेचे सदस्य शरद अग्रवाल उपस्थित होते.

स्पर्धेचे तांत्रिक नियोजन क्री.मा. अक्षय टेंभुर्णीकर हे हे पाहत आहेत. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सेवानिवृत्तक्रीडा शिक्षक उल्हास देशमुख, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक विठ्ठल लोथे यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सतीसचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे, राजू उगवेकर,राहुल तारपुरे,गजानन चाटसे,रसिका मेहेसरे,अनुप वर्मा, खंडारे, अशोक वाठोरे परिश्रम घेत आहेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट कळवितात.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!