Join WhatsApp group

विधानसभे 32 मधले पाच पांडव

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर – विधानसभा 32 मध्ये निवडणूक मतदारांसाठी जास्तच गोंधळकारी ठरतणा दिसत आहे.

हवा कुणाची हे अद्याप जनतेला समजत नाही आहे.आता खर मनोवैज्ञानिक पद्धतीने प्रचाराला सुरुवात झाली आहे, साम-दाम-दंड-भेद प्रत्येक उमेदवार या आधारे आप आपले प्रचार करत आहे, रात्रंदिवस प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले प्रचाराचे काम करणे सुरू केले आहे.

उमेदवार सकाळी सात वाजता पासून तर रात्री दोन तीन वाजेपर्यंत आपले प्रचार व गुप्त बैठका करत आहे. प्रचार करताना उमेदवाराला भेटी जास्त वेळ कमी अश्या परेशानीचा सामना करावा लागत आहे. वेळ कमी असल्यामुळे आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे त्यांचे उद्देश आहे.

कार्यकर्ते,सहकारी, परिवार सगळी मंडळी प्रचार करताना दिसत आहे सगळ्यात मोठा प्रश्न लोकांच्या अशा अपेक्षा पूर्ण करणे हे उमेदवाराला भारी जाताना दिसत आहे. कारण काही समाज व त्यातील वर्ग आपल्या इच्छा अपेक्षा यांचा पहाडा उमेदवारासमोर वाचत आहे फुल नाही तर फुलाची पाकळी उमेदवारांकडून सगळ्यांना देणे सुरू आहे.

हवा कुणाची ?

सगळा खेळ आता पैशांच्या भरोशावर येऊन ठेपला आहे, कोण किती पैसे खर्च करून आपली हवा टिकवून ठेवतो, कोण किती व कोण कोणत्या समाजाचा अपेक्षा पूर्ण करतो ? कोण रोज दारू मटनच्या पार्ट्या देतो ? या वर त्याची हवा राहणार आहे. तस बघितलं तर हवा कुणाची नसते कारण कोणाला मत द्यायचे हे अगोदर सगळ्याचे ठरले असते. तरी वायपट खर्च करून उमेदवार आप आपली हवा तयार करत असतात.

या पाच पांडव मध्ये द्रोपती (खुर्ची) आता फसली असल्याचे चित्र सध्या विधानसभा ३२ मध्ये दिसत आहे. आता द्रोपती कुणाची हे निकालाचा दिवशी समजणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!