Join WhatsApp group

एक अपक्ष उमेदवार करत आहे पाठिंबा देण्यासाठी दहा लाखाची मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – १२.नोव्हें.२४ – निवडणूक जवळ आली कि पैशांचा महापूर येत असतो, निवडणूक म्हणजे काही लोकांन साठी कमी वेळेसाठी रोजगाराची संधी किंवा कमी वेळेत जास्त नफ्याचा व्यवसाय असेच घडत आहे, या वेळेस मुर्तीजापुर ३२ मतदारसंघात एक ग्रामीण विभागातील पट्ठ्याने राजकारणातली त्याला काही जाणीव नसून तो ग्रामपंचायत असो कि लोकसभा हे महाशय प्रत्येक निवडणुकीला उभे असतात.

निवडणूक आधी पुण्याला जाऊन आपल्या जवाया कडून निवडणुकीला फॉर्म भरण्यासाठी पैसे आणतात नंतर कोणत्या तरी छोट्या मोठ्या पक्षाचे तिकीट आणतात आणि पक्षाचा फंड येईल या आशेत असतात, फॉर्म भरल्या नंतर उमेदवार म्हटल कि खर्च लागू असतो कमीत कमी मित्रांना जेवण दारू इतर खर्च करावाच लागतोच असा वायपट खर्च टाळण्यासाठी साठी महाशय बडनेरा येथे जाऊन आपल्या नातेवाइक यांचा घरी आराम करतो.

या वर्षी त्यांनी ज्या पक्षाचा AB फॉर्म आपल्या उमेदवारी साठी जोडला त्या पक्षाने वीस लाख पार्टी फंड देण्यासाठी कबुल केले होते, पण आता पर्यंत पार्टी फंड महाशयला मिळाले नसून यांचे एक लाख रुपय खर्च झाल्या असल्याचे समजते. जावयाचे पैसे परत कसे परत कराचे हे सगळ्यात मोठे प्रश्न त्यांचा समोर सध्या उभे आहे.

आता त्यासाठी वेगवेगळ्या उमेदवारा जवळ जावून दहा लाखाची मागणी करताना ते दिसत आहे, आणि कमी वेळेत जास्त नफा कुठे मिळणार या साठी त्यांचे प्रयन्त सुरु आहे. लोकशाही लाजेल असला प्रकार सध्या मतदार संघात सुरु आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!