प्रेमराज शर्मा – ४ नोव्हेंबर २४ – मुर्तीजापुर बर्शिटाकली मतदार संघात एकूण २९ उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगा कडे दाखल होते . निवडणूक आयोगा कळून आज अर्ज मागे घेण्याची अतिंम तारीख जाहीर करण्यात आली होती. अखेर राजकीय खेळातले एक महत्वाचे भाग आज पूर्ण होऊन नवीन खेळाला सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडी, महायुती, वंचित मधल्या काही नाराज लोकांनी आपला मुल्य पक्षाला माहित समजावे या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चर्चा होती. तर काही ने आर्थिक लाभासाठी तर काही ने भविष्यात पक्षाकडून काही मोठे पॅकेज मिळावे या साठी त्यांचे प्रयत्न होते.
अखेर त्यांचा अशा अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्याचे काही सूत्रान कडून समजले, अर्ज मागे घेण्याऱ्या लोकांवर सरकार माझा लक्ष ठेऊन आहे, वेळ आल्यावर यांनी केलेल्या व्यवहारा बद्दल सांगण्यात येईल, निवडणूक झाल्यानंतर पण निवडणुकीत काय काय घडले हे सविस्तर सरकार माझा आपल्याला सांगेलच.
तर आज निवडणूक आयोगाने प्रेसनोट च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज परत घेणाऱ्या उमेदवारांचे नाव जाहीर केले –
राजेश तुळशीराम खडे,रवींद्र नामदेव पंडित,भाऊराव सुखदेवराव तायडे,संतोष देविदास इंगळे, अरुण सखाराम गवई,दयाराम बोंदरू घोडे,सिद्धार्थ ब्रह्मदेव डोंगरे, गजानन शिवराम वजीरे,पंकज ओंकार सावळे, महेश पांडुरंग घनगाव, राजकुमार नारायण नाचणे, विनोद बाबुलाल सदाफळे,सुनील जानराव वानखडे,महादेवराव इंगळे महादेव बापूराव गवळे,गोपाळराव हरिभाऊ कटाळे असे एकूण १६ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले
हे उमेदवार खरच निवडणुक लढण्यासाठी मैदानात होते का? कि अशी काय मजबुरी होती यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले हे त्यांना नेते मानणाऱ्या जनतेणे विचारावे किंवा आपले तर्कशास्त्र वापरून या नावावर चिंतन करावे.

