Join WhatsApp group

होमगार्ड ची दिवाळी अंधारात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – ३१/ ११/२४ – दिवाळी म्हटलं कि खर्च आणि खर्च म्हटलं कि पैसा, पैसा म्हटलं कि सगळ्यात मोठ ताण असाच ताण सध्या अकोला जिह्यात होमगार्ड वर्गाला आला आहे . शासनाने जणू दिवाळी अंधारात साजरी करायला होमगार्ड वर्गाला मजबुर केले आहे, होमगार्ड वर्गात अशी चर्चा आहे कि त्यांना कृष्ण जन्माष्टमी पासून तर नवरात्री बंदोबस्त पर्यंतचे मानधन मिळाले नसून त्यांना आपल्या मुला बाळांना कपडे घेण्यासाठी व घरात किराणा भरण्यासाठी घरचे सोने गहाण ठेऊन व्याजा वर पैसे काढून दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे उद्याची दिवाळी असून यांचे पण चिमुकले दुसर्यांचा चिमुकल्यांना फटाके फोडताना बघत आहे बाबा आम्हाला कदि फटाके आणणार असे प्रश्न केल्यावर त्यांचा कढे उत्तर नाही व त्यांचे डोळे पानाव लेले दिसत आहे.

सरकार माझा ने होमगार्डचे केंद्र नायक यांचा सोबत भ्रमणध्वनी वरून संवाद साधले असून, त्यांचे म्हणणे होते कि आज संध्यकाळ पर्यंत यांचे मानधन यांचा बँक खात्यात जमा असेल आम्ही त्यासाठी पुरे पूर प्रयन्त करत आहो, तरी अद्याप सध्या पर्यंत त्यांचे मानधन जमा न झाल्याचे समजते.

उद्या दिवाळीचा दिवशी लक्ष्मि होमगार्ड वर्गाला प्रसन्न होईल का? असे प्रश्न जिल्ह्यातील होमगार्ड वर्गाला पडले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!